¡Sorpréndeme!

जेव्हा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कामाची पाहणी करतात; पाहा व्हिडीओ | Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

डोंगरगण ते बांबोरी रस्त्यावर नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा ताफा अचानक थांबला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. निविदेत नमूद केल्याप्रमाणे काम होत नसल्याचे लक्षात आले. तसा रागाचा पारा चढला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना तत्काळ संपर्क साधून, रस्त्याच्या कामाची जबाबदारी असलेल्या अभियंत्यावर कठोर कारवाईचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले. संबंधित अभियंत्यास तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले.